Friday, December 19, 2008

कधि कुठे न भेटणार

कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार

निखळे कधि अश्रू एक
ज्यात तुझे बिंब दिसे
निखळे निःश्वास एक
ज्यात तुझी याद असे

पण तिथेच ते तिथेच
मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच
हे असेच चालणार

गीत-इंदिरा संत
संगीत-गजानन वाटवे
स्वर-रंजना जोगळेकर

Thursday, May 29, 2008

शेवटचा अध्याय..........पु.लं.

'हॉस्पीटल'हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो.त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोशित करणं सोपंजातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस.टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढेसरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो...हॉस्पीटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे ' दुश्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पीटलमधे गेलो होतो! यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोश्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पीटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. (अलीकडे 'वळण' जरी 'सरळ'पणाकडे 'झुकत' असलं, तरी 'घाटा'चा 'कल' मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्शात आलं.) हॉस्पीटलमधे जायचा पूवार्नुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोश्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रानीशीच जायच आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिश्ट्मंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉडर् आठवली. हॉस्पीटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!)
डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अथार्त मला तपासणा-या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहका-यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणा-या आचार्य बाबा बर्व्यानच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टसर् जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रिपूर्वक सांगतो!) ... त्यानंतर काही वरिषठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्रि झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेह-यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल. अशा रीतीनं माझं हॉस्पीटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं - एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पीटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्शेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्शात आलं.किंबहुना 'एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तीमागे किती' अशी गिणतंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'व्यवस्थित स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' ईथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनीजेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले, तेव्हा मा्त्र डॉक्टरांनी मला तर्हेतरहेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले. हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयिसंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढयासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... अशा विचारांतच मला झोप लागली...मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्यामाणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आतापर्यन्त! (अगदी 'बटाट्याच्या चाळी'च्या कर्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफसर्ची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत? नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यानाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंचनाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले...अगदी कायमचेच...
आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकंत्यांना पुन्हा हसवतील... अगदी कायमचीच....

Thursday, May 22, 2008

Vijay Tendulkar...

"I love to indulge in the physical process of writing. I enjoy this process even when there is nothing to be said..Give me a piece of paper, any paper, and a pen and I shall write as naturally as bird flies or a fish swims. Left to myself I scribble. And I never get tired of writing. I mean the physical process of writing. Lately I have learnt to work on a Word Processor. But I still prefer to write with my hand. Especially when I write in my mother-language i.e., Marathi. Writing gives me a pleasure which has no substitute. However tired I am, physically or mentally, the moment I pick up the pen and begin running it on a paper-any piece of paper-I feel good. I feel refreshed. I feel as if I am born again. Writing by itself is a luxury for me. When I write I forget myself. I forget my anxieties. I do not care what is around me… And I have written on the sick bed in the hospital in spite of my doctor's advice not to tax myself. He did not know and would not accept that writing was not taxing to me at all. On the contrary it was soothing. It was a great relief. It was joy…"

- Mr. VIJAY TENDULKAR

Wednesday, May 21, 2008

असंच काहीतरी

मला सजवण्या मागे, तुमचा काय बेत आहे माझया शरीराचा कोणता, अर्थ अभिप्रेत आहे फुल होऊन आतास, कुठे मी फुलू पाहतो कोण चार खांद्यावरुन, मला असं नेत आहे कधी ज्यांच्यासाठी मी, त्यांचं दूनिया होतो मला एकटं सोडताना, ते कोणत्या दुनियेत आहे आजवर प्रत्येकाला, मी आधारच देत आलो मग माझा भार का, असा लाकडावर येत आहे ज्यांच्या पोटापाण्यासाठी, मी वणवण फिरलो माझ्या भोवती फिरून, का तोंडात पाणी टाकत आहे तेवलो मी त्यांच्यासाठी, प्रकाश मिळावा म्हणून अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे मला नाही पटलं माझ्याच आप्तेष्टांचं वागणं सरणावरून उठलो, तर म्हणे भूतप्रेत आहे मातीचा लगाव मला, शेवटी मातीतच मिसळलो थोडाफार जे उरलो, ती राख गंगेत आहे आठवण माझी येताच, नजर फिरवा आभाळभर असंख्य रुपात लुकलुकत, मी त्याच्या कवेत आहे समजू नका मी गेलो, आहे अजून तुमच्यातच मरणावरच्या प्रत्येक कवितेत, जिवंत भूमिकेत आहे प्रत्येक जबाबदारी मी, यशस्वी रित्या पार पाडली माझी जबाबदारी त्यांच्यावर, मी कोणत्या भूमिकेत आहे जन्मापासून कोणी पुढे, तर कोणी मागे आहे उभं आज मी एकटाच, मी नक्की कोणत्या रांगेत आहे- सनिल पांगे

Thursday, March 27, 2008

आँम्‍लेट

कोंबडीच्‍या अंड्‍यामधून बाहेर आलं पिल्‍लू;
अगदी होतं छोटं आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍हणाली पिल्‍लूबाळ, सांग तुला काय हवे?
किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे;
आणून देईन तुला हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍हणाले,"आई दुसरे नको काही
छोट्‍याशा कपामधे चहा भरुन दे,
मला एका अंड्‍याचे आँम्‍लेट करून दे !!"

- मंगेश पाडगावकर

Friday, March 14, 2008

कुसुमाग्रजांच्या स्म्र्रुतिला विनम्र अभिवादन करून...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"

कवितासंग्रह - विशाखा

Tuesday, March 11, 2008

पारीजातकाचं आयुष्‍यं मिळालं तरी चालेल...लयलूट करायची ती मात्र सुगंधाचीच...

- व.पु.काळे

Monday, February 25, 2008

चुकली दिशा तरीही


हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही"

-अनामिक
एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी, या वाहणार्‍या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी क्षितीजातूनी उगवेन...

मी
- सुधीर मोघे
सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात
अनोळखीही असतात काही
डोळे जरी फ़सले तरी
मन कधीच फ़सत नाही...

आपणच पटववून देत असतो
अनोळखीतील ओळख मनाला
दिवस उलटले की आपण
पुन्हा एकदा ओळखतो स्वत:ला...

अगदी जवळचे चेहरेही
कधी कधी ओळख हरवून बसतात
काही गोष्टी मात्र चेहरे नसूनही
खूप ओळखीच्या वाटतात...

धडधडत्या ह्र्दयाला कुठे असतो असा स्वत:चा चेहरा
पण त्यातील प्रत्येक ठोका असतोच ना आपला?
कागदावरचे शब्दही हा नियम मोडत नाहीत
कधी मी त्यांना तर कधी ते मला ओळखत नाहीत...

- योगेश गोसावी
ज़न्माला आला आहेस,
थोडं जगुन बघ
जीवनात दु:ख खूप आहे,
थोडं सोसून बघ !

चिमुट्भर दु:खाने कोसळू नकोस,
दु:खाचे पहाड चढून बघ !
यशाची चव चाखून बघ,
अपयश येतं, निरखून बघ

डाव मांडणं सोपं असतं,
थोडं खेळून बघ !
घरटं बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करुन बघ !

जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं,
दोन्हीतल्या वेदना झेलून बघ !
ज़ीणं - मरणं एक कोडं असतं,
जाता - जाता एवढं सोडवून बघ !

- अनामिक
आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही...

- कुसुमाग्रज
क्षितीजाचे तट फोडून
धावे अश्व सनातन मार्गावरती. .
पायतळी चुरल्या काळाचा
चुरा पथावर उडतो भवती. .
रवी-शशीचे परजीत पलिते
स्वार तयावर बसला आहे. .
अश्व न जाणे स्वार न जाणे
प्रवास कुठला कसला आहे. . . .

- अनामिक
एक अंध मुलगी होती, ती तिचा प्रियकर सोडला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची...
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याशी लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणीतरी नेत्रदान केले...
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले, आता मझ्याशी लग्न करशील का?पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुष्‍यातून निघुन जाताना तो फक्त इतकेच म्हणाला..." माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

- अनामिक
मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते...

-अनामिक
कारण शेवटी मी एक.....
आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला
पण माझ्याकॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
ए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले
भुला भटका missed call आता महाग झालाय
फोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो
वेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो
पण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली
बेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली
पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
ऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहेकारण शेवटी मी एक...

आभार - गिरीश आणि कवी ..