Thursday, March 27, 2008

आँम्‍लेट

कोंबडीच्‍या अंड्‍यामधून बाहेर आलं पिल्‍लू;
अगदी होतं छोटं आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍हणाली पिल्‍लूबाळ, सांग तुला काय हवे?
किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे;
आणून देईन तुला हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍हणाले,"आई दुसरे नको काही
छोट्‍याशा कपामधे चहा भरुन दे,
मला एका अंड्‍याचे आँम्‍लेट करून दे !!"

- मंगेश पाडगावकर

Friday, March 14, 2008

कुसुमाग्रजांच्या स्म्र्रुतिला विनम्र अभिवादन करून...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"

कवितासंग्रह - विशाखा

Tuesday, March 11, 2008

पारीजातकाचं आयुष्‍यं मिळालं तरी चालेल...लयलूट करायची ती मात्र सुगंधाचीच...

- व.पु.काळे