Monday, February 25, 2008

चुकली दिशा तरीही


हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही"

-अनामिक
एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी, या वाहणार्‍या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी क्षितीजातूनी उगवेन...

मी
- सुधीर मोघे
सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात
अनोळखीही असतात काही
डोळे जरी फ़सले तरी
मन कधीच फ़सत नाही...

आपणच पटववून देत असतो
अनोळखीतील ओळख मनाला
दिवस उलटले की आपण
पुन्हा एकदा ओळखतो स्वत:ला...

अगदी जवळचे चेहरेही
कधी कधी ओळख हरवून बसतात
काही गोष्टी मात्र चेहरे नसूनही
खूप ओळखीच्या वाटतात...

धडधडत्या ह्र्दयाला कुठे असतो असा स्वत:चा चेहरा
पण त्यातील प्रत्येक ठोका असतोच ना आपला?
कागदावरचे शब्दही हा नियम मोडत नाहीत
कधी मी त्यांना तर कधी ते मला ओळखत नाहीत...

- योगेश गोसावी
ज़न्माला आला आहेस,
थोडं जगुन बघ
जीवनात दु:ख खूप आहे,
थोडं सोसून बघ !

चिमुट्भर दु:खाने कोसळू नकोस,
दु:खाचे पहाड चढून बघ !
यशाची चव चाखून बघ,
अपयश येतं, निरखून बघ

डाव मांडणं सोपं असतं,
थोडं खेळून बघ !
घरटं बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करुन बघ !

जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं,
दोन्हीतल्या वेदना झेलून बघ !
ज़ीणं - मरणं एक कोडं असतं,
जाता - जाता एवढं सोडवून बघ !

- अनामिक
आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही...

- कुसुमाग्रज
क्षितीजाचे तट फोडून
धावे अश्व सनातन मार्गावरती. .
पायतळी चुरल्या काळाचा
चुरा पथावर उडतो भवती. .
रवी-शशीचे परजीत पलिते
स्वार तयावर बसला आहे. .
अश्व न जाणे स्वार न जाणे
प्रवास कुठला कसला आहे. . . .

- अनामिक
एक अंध मुलगी होती, ती तिचा प्रियकर सोडला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची...
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याशी लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणीतरी नेत्रदान केले...
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले, आता मझ्याशी लग्न करशील का?पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुष्‍यातून निघुन जाताना तो फक्त इतकेच म्हणाला..." माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

- अनामिक
मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते...

-अनामिक
कारण शेवटी मी एक.....
आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला
पण माझ्याकॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
ए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले
भुला भटका missed call आता महाग झालाय
फोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो
वेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो
पण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली
बेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली
पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहें

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
ऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहेकारण शेवटी मी एक...

आभार - गिरीश आणि कवी ..