ज़न्माला आला आहेस,
थोडं जगुन बघ
जीवनात दु:ख खूप आहे,
थोडं सोसून बघ !
चिमुट्भर दु:खाने कोसळू नकोस,
दु:खाचे पहाड चढून बघ !
यशाची चव चाखून बघ,
अपयश येतं, निरखून बघ
डाव मांडणं सोपं असतं,
थोडं खेळून बघ !
घरटं बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करुन बघ !
जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं,
दोन्हीतल्या वेदना झेलून बघ !
ज़ीणं - मरणं एक कोडं असतं,
जाता - जाता एवढं सोडवून बघ !
- अनामिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment